नाशिक जिल्ह्यातून किसान रेल्वे आता आठवड्यातून चार दिवस धावणार…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नाशिक, दि. ३ मार्च : जिल्ह्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांची महत्त्वाच्या मागणीची दखल घेत यापुढे किसान रेल्वे आठवड्यातून चार दिवस सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे कांदा, द्राक्ष, टोमॅटो उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे प्रयत्न यशस्वी ठरले आहे.

गेल्या महिन्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या सोबत झालेल्या व्हर्म्युअल बैठकीत डॉ. पवार यांनी रेल्वे रेल्वे मंत्रालयाकडे केलेल्या मागणीची दखल घेऊन, मध्य रेल्वेच्या नाशिकरोड रेल्वे स्थानकातून आठवड्यातून तीन दिवस सोडण्यात येणारी किसान रेल आता चार दिवस सोडण्यात येणार आहे. यामुळे आता शेतीमाल वेळेत परराज्यात पोहोचणार असल्यामुळे योग्य बाजार भाव मिळण्यास मदत होणार असल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले

नाशिकहुन किसान रेल्वे सद्या आठवड्यातून सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार अशी धावणार आहे, तसेच किसान रेल्वेला लासलगाव येथे थांबा देण्यात आल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे, आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथून दानापूरला ९६ टन कांदा रवाना करण्यात आला आहे.

पिंपळगाव तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा, भुसार, तेलबिया, डाळिंबांसह फळे व भाजीपाल्याच्या खरेदी विक्रीसाठी नावाजलेली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. द्राक्षमाल पाठविण्यासाठी येथील व्यापारी व शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार आहे.

त्यामुळे वस्तुस्थितीचा विचार करून किसान रेल्वे नाशिक येथून दररोज सुरू करण्यात यावी, जिल्ह्यातील शेतमाल किसान रेल्वेद्वारे जास्तीत जास्त प्रमाणात बाहेरगावी पाठविता यावा, यासाठी मध्य रेल्वेच्या नाशिक जिल्ह्यातील देवळाली, नाशिकरोड, खेरवाडी, निफाड, लासलगाव, स्टेशनवर किसानसेवा रेल्वेच्या प्रत्येकी पाच ते सहा पार्सल व्हॅनची गरज आहे. त्यानुसार बोगी वाढवण्यात याव्यात, अशी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

हे देखील वाचा : 

अमेरिका, इग्लंड, जपानचा झेंडा रशियाने काढला, तिरंगा मात्र सही सलामत

रशिया-युक्रेन युद्धामुळे होळीपुर्वीच तेलाचा उडाला भडका

 

 

 

kisan railwaylead news