गडचांदूरात दुकानासमोर बॉम्ब सदृश वस्तू ठेवणारे दोन इसमास स्थानिक गुन्हे शाखा व गडचांदूर पोलीस स्टेशनच्या पथकानी घेतले ताब्यात

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपुर : चंद्रपुर जिल्हातील गडचांदूर शहरातील बसस्टॉप चौकातील भगवती NX कापड दूकान समोर बॉम्ब ठेवल्बायाबतची माहीती त्या दूकानाचे मालक शिरीष सूर्यकांतराव बोगावार यांना फोन व्दारे दि, 30 जुलै रोजी दूपारी मिळाली होती. त्यावेळी दूकानाचे मालक पोलीस स्टेशन गडचांदूर यांना फोनव्दारे माहीती दिले त्याचेवरून त्यांनी पोलीस कर्मचारी पाठवून त्या दूकानासमोर झडती घेतली असता त्या दूकानाच्या समोर एक संशयास्पद बॅग दिसून आली .त्यामध्ये दूरून पाहिले असता लाईट टिपटिप करीत असल्याचे दिसून आले त्यावरून पोस्टे गडचांदूर ठाणेदार यांनी सदर माहीती पोलीस अधीक्षक यांना देताच घटनेचे गांभीर्य ओळखून बॉम्ब शोध पथक (BDDS) ला रवाना केले,  

दरम्यान पोलीस अधिक्षक, चंद्रपुर व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, पोनी. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर हे घटनास्थळी तात्काळ हजर झाले तसेच BDDS पथक चंद्रपूर व गडचिरोली यांना पाचारण करण्यात आले व त्याचे सहाय्याने सदर बॉम्ब Defuse करण्याचे काम राबविले. दरम्यान आरोपी शोध कामी गडचांदूर पोलीस स्टॉप व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, उपविभाग गडचांदूर मधील वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आली.

त्यावेळी घटनास्थळाबाहेरील CCTV फूटेज व कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन गडचांदूर यांनी दोन संशयीत इसमांना ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचेवर असलेले कर्जामूळे दूकानदार यांना फोनकरून खंडणी मागण्याचे उद्देशाने सदरचे कृत्य केल्याचे कबूल केले. त्यांनतर BDDS पथक चंद्रपूर व गडचिरोली यांना सदर बॉम्बची Defuse करण्याकामी पाहणी केली असता सदर बॉम्ब हा बनावटी असल्याचे दिसून आले. सदर प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आले असून पूढील तपास ठाणेदार गडचांदूर हे करीत आहेत.

हे देखील वाचा ,

….अखरे चातगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी पडवे चौकशीत दोषी आढळल्याने निलंबित

चंद्रपूर क्राईमपालकमंत्री सुधीर mungantiwarपोलीस अधिक्षक चंद्रपूरपोलीस स्टेशन राजुरा