लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची चूल सध्या वेगळी आहे. लोकसभेला महायुतीच्या अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना परभणीची जागा लढविली होती. पण आता त्यांनी अचानक यूटर्न घेतला, अचानक 360 डिग्री वळसा घेत भाजपावरच टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महादेव जानकर यांनी अचानक भाजपाच्या गळ्यातील ताईत असलेले जानकर अचानक मित्र पक्षावरच भडकलेले आहे.
बारामती मतदारसंघातील काटेवाडी कण्हेरी येथील त्यांचे भाषण चांगलेच गाजले. त्यांनी मित्रपक्षाला फटकारले पण पवारांच्या घराणेशाहीवर पण चिमटे काढले. बारामती मला नवीन नाही मी बारामतीला यासाठी आलो आहे मी खासदारकीचा पडीक उमेदवार आहे पाच वेळा मी खासदारकी लढवली आहे आमदारकी कधीच लढवली नाही, महाराष्ट्रात 288 जागा उभा केल्या. कार्यकर्ते म्हणायला लागले म्हणून आमदारकी करिता उभा राहीलो. मी खासदार मंत्री झालो ते आपल्या चिन्हावर झालो मी दुसऱ्यांच्या चिन्हावर झालो नाही. मी जर घोटाळा केला असता चोऱ्या केल्या असत्या तर माझ्याही मागे ईडी लावली असती मला म्हणले असते तुम्हाला आमच्याबरोबर राहावं लागेल नाहीतर तो आत तुरुंगात टाकू, असे जोरदार भाषण त्यांनी केले.
काहीजण म्हणायचे महादेव जाणकर याचं काही खरं नाही पण महादेव जानकर बोलतो सांगतो तो पाळतो. मी चाळीस वर्षांपूर्वी सांगीतलं होतं एक दिवस पंतप्रधान होईल मी आज कॅबिनेट मिनिस्टर म्हणून तुमच्याकडे भाषण करत आहे तोही माझ्या पक्षातून करत आहे. त्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना विचारलं. आम्हाला बोलवलं नाही जेवायला तर जायचं कशाला ? आम्ही स्वाभिमानी माणस आहोत, असे जानकर म्हणाले.
भाजप पक्षावर तीव्र प्रतिक्रिया
महादेव जाणकर यांनी थेट भाजपाची मस्तीच काढली आहे, दोन आमदार पळवण्याचे हे प्रकरण आहे त्यांनी काय केलं शिवसेना फोडली. राष्ट्रवादी फोडली. कुठला माणूस कुठ नेवून ठेवला आहे. आमचे एक दोन आमदार होते ते आमदार पण पळवले. आमचा आमदार निवडून येतो आमच्या पक्षावर आणि तुम्ही भाजप बरोबर घेऊन जाता, असा खरमरीत सवाल त्यांनी केला. आपल्याच मित्रपक्षाला जानकरांनी खरी-खोटी सुनावली. तर देवकाते आणि कोकरे लक्षात ठेवा तुम्हाला फक्त महादेव जानकरच आमदार करू शकतो, असा दावा केला.