मुंबईत शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

शिवसेनेतील 11 खासदार एकनाथ शिंदे गटात सामिल होऊ शकतात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 मुंबई ६ जुलै :- शिवसेनेला संघटनात्मक पातळीवर खिंडार पडायला सुरुवात सुरुवात झाली आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थनार्थ मागाठाणेतील दोन शाखाप्रमुख, तीन महिला शाखा संघटकांचे राजीनामे दिले आहेत. शिवसेनेत सुरू असलेले बंडखोरीचे लोण आता खासदारांमध्ये पसरण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेच्या 18 लोकसभेच्या खासदारांपैकी 11 खासदार शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएच्या उमेदवाराला मतदान करावे अशी मागणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे. शिवसेनेकडून सध्या विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला जाणार असल्याची शक्यता आहे.

मुंबईत काही आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सुरु आहेत. मुंबईत आता शिवसेनेला संघटनात्मक पातळीवरही खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत शिवसेनेचे चार आमदार शिंदे गटात गेल्यानंतरही आतापर्यंत संघटनात्मक पातळीवर कुणीही राजीनामे दिले नव्हते, परंतु आता बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. मागाठाणेतील दोन शाखाप्रमुख आणि तीन महिला शाखा संघटकांचे पदाचे राजीनामा दिले आहेत.

शाखा क्रमांक 3चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि महिला संघटक सुषमा पुजारी, शाखा क्रमांक 12 चे शाखाप्रमुख कौस्तुभ म्हामूणकर, शाखा क्रमांक 26 च्या महिला शाखा संघटक हेमलता नायडू, शाखा क्रमांक 5च्या महिला शाखा संघटक विद्या पोतदार यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

praksh surverahul shevadshena bhavanshiv shenashna cresesUddhav Thakarey