राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता.

राज्य सरकारने कोरोनाची यंत्रणा सज्ज ठेवण्याचे दिले आहे आदेश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

औरंगाबाद डेस्क :- राज्य सरकारने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यातील आरोग्य विभागाला सतर्कतेचा आदेश देण्यात आले आहेत. औरंगाबाद दौऱ्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे आले होते. त्यावेळी त्यांनी दुसरी लाट येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली आहे. 

सध्या हवामानात बदल झाला आहे. थंडीचा हंगाम असल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. त्यामुळे आपण काळजी घेण्याची आवश्यता आहे. राज्यात कोरोनाची रुग्णांची कमी झालेली आहे. जवळपास ८० टक्के बेड रिकामी आहेत. त्यानुसार आढवा घेतला जात आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात सांगण्यात आले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

कोरोना जागतिक महामारीमध्ये देशात महाराष्ट्र राज्याने मोठ्या संख्येने असतानाही आपण या परिस्थितीवर काही प्रमाणात मात करण्यास यशस्वी ठरलो आहोत. मात्र आपल्याला गाफील राहून चालणार नाही, राजेश टोपे म्हणाले.