लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था : एका चित्रपटाला शोभेल अशी घटना तेलंगाणामध्ये घडली आहे. एका तरुणाने आपल्या दोन गर्लफ्रेंडशी एकाच मांडवात लग्न केले आहे. या लग्नासाठी मुलींच्या पालकांनीही हसत हसत परवानगी दिली होती.
तेलंगाणाच्या उन्नूर अंचल भागात अर्जुन नावाचा आदिवासी तरुण राहतो. अर्जूनने बी.एड. पर्यंत शिक्षण घेतले असून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. त्याची ओळख उषाराणी आणि सुरेखा या दोन तरुणींशी झाली. अर्जुनचे दोन्ही तरुणींवर प्रेम होते तसेच दोघींचेही अर्जुनवर प्रेम होते. अर्जुन एकाच वेळी दोघींना डेट करत होता.
परंतु अर्जुनच्या कुटुंबीयांनी त्याला लग्न करण्यास सांगितले तेव्हा तो पेचात सापडला. अर्जूनचे दोन्ही मुलींवर तितकेच प्रेम होते. म्हणून त्याला दोघींशीही लग्न करायचे होते. सुरूवातीला अर्जुनच्या आई वडिलांनी नकार दिला, पण मुलाच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही.
तर दुसरीकडे उषाराणी आणि सुरेखा यांच्याही पालकांची समजूत काढली आणि त्यांनी परवानगी दिली. मग अर्जुनच्या गावात मोठ्या धुमधडाक्यात एकाच मांडवात लग्न लावण्यात आले. हे लग्न पाहण्यासाठी पंचक्रोशीतून लोक जमा झाले होते. काही आदिवासी जमातींमध्ये अशा प्रकारची लग्न सामान्य बाब असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
ऐकावे ते नवलच ! एका वराने चक्क दोन वधूंसोबत एकाच मांडवात बांधली लगीन गाठ
यापूर्वी छत्तीसगडमध्ये एका आदिवासी तरुणाने आपल्या दोन प्रेयसींशी लग्न केले होते. छत्तीसगढमध्ये नक्षलग्रस्त भागात एका तरुणाने आपल्या दोन्ही गर्लफ्रेंडशी एका मांडवात लग्न केले होते. या लग्नाला तब्बल ५०० वर्हाड्यांनी उपस्थिती नोंदवली होती. लग्नानंतर आपण खूश असल्याचे दोघींनी सांगितले होते.
हे देखील वाचा :
चार दिवसाच्या चिमुकलीची वैरीण झाली माता, कॅरीबॅगमध्ये बेवारस सोडून केले स्वतःचे पलायन!
Exclusive Story : शववाहिका चालक म्हणून काम करते ‘हि’ जिगरबाज मुलगी