लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर डेस्क, दि. ४ मार्च : महापौर, संसद सदस्य, मंत्री कुठल्या पक्षाचा नसतो, तो सरकारचा असतो आणि त्याचं कर्तव्य असतं की जे योग्य काम आहे ते केले पाहिजे. कुठल्याही पक्षाचा, कुठलाही काम असो त्याने काम केलं पाहिजे त्यात राजनीति नको हाच लोकतंत्रचा सर्वात मोठा नियम आहे असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपूर येथे व्यक्त केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगर पालिका तर्फे आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण देशात नागपूर शहराचे नावलौकिक करणाऱ्या मान्यवरांचा नागरिक सत्कार कार्यक्रम नागपूर महानगर पालिकेच्या परिसरात आयोजित करण्यात आलेला होता त्यावेळेला ते बोलत होते. पुढे ते म्हणाले राजनीति मध्ये जे या पदावर असताना त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे त्याचा मोठा फायदा होत असतो.
पुढे ते म्हणाले या कामात समाधान असने महत्त्वाचे आहे जनतेने आम्हाला काम करण्याची संधी दिली हाच लोकप्रतिनिधींचा सर्वात मोठा पुरस्कार असतो तो तुम्हाला जिंकून मिळालेला आहे. राजनीती ही बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन आहे प्रत्येक स्टेशनवर लोक उतरतात आणि चढतात. राजकारणात कठीण परिस्थितीवर मात करून काम करावे लागते यावर मात करून लोकांची सेवा करावी लागते असेही ते म्हणाले. नागपूर महानगर पालिकेने तसेच महापौरांनी चांगलं काम केलं असेही ते म्हणाले. कठीण काळात नागपूर महानगरपालिकेने चांगले काम केले आहे असेही गडकरी म्हणाले.
या वेळेला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते नागपूर चे नाव ज्यांनी देश-विदेशात गौरव वाढविला आहे अशा मान्यवरांच्या या वेळेला पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला या महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांचा तसेच सोलर इंडस्ट्रीजचे प्रबंध निदेशक सत्यनारायण नुवाल, स्केटिंग मध्ये सुवर्ण पदक विजेता अदवेत रेड्डी यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच एका दिव्यांग मुलीला ब्रेल लिपीचा लॅपटॉप खरेदी करण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते निधी प्रदान करण्यात आला तसेच नागपूर महानगर पालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या गीत लेखन स्पर्धाचे बक्षीस देखील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
हे देखील वाचा :
विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी तारीख द्या; राज्यपालांना दिले निवेदन – अजित पवार