आंतरराष्ट्रीय जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे ‘मान्सून आर्ट शो’ गडचिरोलीची रुषाली उईके हिच्या कलाकृतीची प्रदर्शनात निवड

मुंबईच्या एका चाहत्याने एक पेंटिंग 35 हजार रुपये किंमतीला घेतले विकत. गडचिरोली जिल्ह्याचा पुन्हा एका युवतीने मानाचा तुरा सन्मानाने रोवला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुलचेरा 23 जुलै :-  आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त असलेल्या जहांगीर आर्ट ऑफ गॅलरी मुंबई येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही 42 व्या ‘मान्सून आर्ट शो’ च्या खुल्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व विद्यार्थी तसेच कला शिक्षणात पारंगत असलेले या सर्वांसाठी खुले दालन केले होते. यामध्ये देशभरातील विविध संस्थेतील कलेत निपुण असलेल्यानी सहभाग नोंदविला होता. यासाठी अंतिम तारीख 18 जुलै ठरविण्यात आली होती. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील नक्षलग्रस्त भागातील कु. वृषाली उईके या विद्यार्थिनी सहभाग नोंदविला असून  या मान्सून आर्ट शो मध्ये भारतातील निवडक विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचा समावेश होता. त्यामध्ये नवरगाव येथे श्री. ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाची जी.डी. आर्ट अंतिम वर्षाची विद्यार्थिनी वृषाली नरेंद्र उईके हि वास्तववादी चित्रशैलीमध्ये दोन कलाकृती निर्माण केल्या होत्या. त्यापैकी एका कलाकृतीची निवड करून एका चाहत्याने  कलाकृती ला 35 हजारात विकत घेऊन वृशालीचा सन्मान वाढविला.

मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर या गावातील वृषाली रहिवाशी असून ग्रामपंचायत सदस्य कविता उईके यांच्या कन्या आहेत.
वृषाली उईके हिला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. त्यामुळे आई-वडिलांनाही तिच्या चित्रकलेला प्रतिसाद देत गेल्याने  वृषालीचाही उत्साह वाढत गेला. त्यानंतर आई-वडिलांनी चित्रकला महाविद्यालयात प्रवेश करून दिले. सध्या नवरगावच्या श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयात पाच वर्षापासून चित्रकलेचे शिक्षण घेत असून तिच्या चित्रामध्ये ग्रामीण जीवनातील प्रसंग आपल्या चित्रकलेत व्यापून टाकत असल्याने तिच्या चित्रातही वास्तविकता समोर दिसून येत असल्याने सर्वत्र तीच कौतुक होत आहे. या निवडीचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य. अतुल कामडी, मार्गदर्शक तसेच आई-वडिलांना देत आहे.

हे देखील वाचा :- 

निरंकारी जनरल स्टोर्सचे व्यावसायिक बेपत्ता की आत्महत्या?…

rupali uyke