मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क 30 मे :- मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं आहे. मंत्रालयातील कंट्रोल रूमला बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. निनावी धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कथित बॉम्बचा तपास सुरु आहे.

साधारणतः तासाभरापूर्वी धमकीचा निनावी फोन मंत्रालयाला आला होता. एक संशयित वस्तू मंत्रालय परिसरात ठेवण्यात आल्याचं त्या फोनवरुन सांगण्यात आलं होतं, अशी माहिती मिळत आहे. त्यानुसार बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलीसांचं पथक याठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. तसेच मोठा फौजफाटही मंत्रालय परिसरात तैनात करण्यात आला आहे.

तासाभरापूर्वी निनावी फोन आल्यानंतर मंत्रालयात सर्च ऑपरेशन सुरु झालं. सुदैवानं आज रविवार म्हणजेच, सुट्टीचा दिवस असल्यामुळे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुट्टी आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, असं पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. गेल्या अर्धा पाऊण तासापासून धमकीचा फोन सुरु आहे. तसेच खरंच हा फोन कोणी केला? याचा शोधही मुंबई पोलीस आणि मंत्रालयातील कंट्रोल रुमकडून घेतला जात आहे.

bomb-squadmantarl bomb attackMumabi mantralaymumbai policephone call