नागपुरातील खरबी चौकात असलेल्या कबाडीच्या दुकानाला भीषण आग.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आज सकाळी 8 वाजता नागपुरातील खरबी चौकात असलेल्या कबाडीच्या दुकानाला भीषण आग लागली । या आगीत व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले ।अग्निशमन विभाग सक्करदार, लकडगंज स्टेशन मधील 3 वाहने घटनास्थळी तात्काळ पोहचले । आणि केवळ अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश मिळाले ।

अग्निशमन विभागाच्या सक्करदार स्टेशन चे अधिकारी सुनील डोकरे यांचा नेतृत्वात 6 जवान आणि लकडगंज स्टेशन चे 4 जवानांच्या मदतीने मोठा अनर्थ टळला…यावेळी बघ्याची गर्दी मोठी होती । विजेचे खंबावर तार जळून खाक होत असल्याने घटनास्थली नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती ।