नागपूर येथील छाबरा हॉटेल्स ग्रुपची मालमत्ता जप्त, ३२.७५ लाखांचा थकीत मालमत्ता कर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क.

नागपूर डेस्क 21 नोव्हें :- सीताबर्डी येथील छाबरा हॉटेल्स ग्रुपसह इतर थकबाकीदारांच्या सहा मालमत्ता नागपूर महानगरपालिकेने जप्त केल्या आहेत. या मालमत्तांवर तब्बल ३२ लाख ७५ हजार २१४ रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहेत. मनपाने वारंवार नोटीस बजावल्यानंतरही थकबाकीचा भरणा करण्यात आला नाही.

धरमपेठ झोन अंतर्गत वॉर्ड क्र. ६६मधील सीताबर्डी येथे छाबरा हॉटेल्स प्रा. लि. च्या मालमत्ता आहेत. तेथे सध्या आयसीआयसीआय बँकेचे विभागीय कार्यालय आहे. या छाबरा हॉटेलवर चालू वर्षाचा १ लाख ७९ हजार ५८९ रुपये आणि जुने २ लाख ६३ हजार ८७२ रुपये थकीत आहेत. मालमत्ता क्र. २२२/डीच्या छाबरा हॉटेक्स लि.चे संचालक दीपक राजेंद्र छाबरा अंतर्गंत सुमन प्रवीण मेहता यांच्याकडे ३ लाख ८६ हजार ३४ रुपये थकीत आहेत. याच छाबरा हॉटेक्स प्रा.लि.चे संचालक दीपक राजेंद्र छाबरा यांच्या मालमत्ता क्र.२२२कडे २ लाख ६२ हजार ४१७ रुपये थकीत आहेत. त्यांच्याच दुसNया बंगल्याकडे ३ लाख ५ हजार १४८ रुपये थकीत आहेत. तर सर्वाधिक थकबाकी ए.एस. शिंदे यांच्याकडे ११ लाख ८५ हजार ७०२ रुपये आहे. जी.एन. अँड डेव्हलपर्सचे शिंदे यांच्याकडे चालू कर केवळ २ हजार ९२७ रुपये आहे. मात्र, थकीत कर तब्बल ११ लाख ८२ हजार ७७५ रुपये आहे.

विजय लक्ष्मीदास पचमटिया, जयदेव लक्ष्मीदास पचमटिया व उमाबेन लक्ष्मीदास पचमटिया यांच्याकडे ३ लाख ८१ हजार २९४ रुपये आणि  गिरीश विष्णुजी देहडिया, हेमेंद्र रामजी अंतर्गत कर्ता मनसुखलाल नागजी गांंगर यांच्याकडे ३ लाख ११ हजार १५८ रुपये थकीत आहेत. या सर्व मालमत्तांच्या मालकांनी २०१४ पासून मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही. मनपाच्या कर आणि कर आकारणी विभागाने सर्व घरमालकांना नोटीस बजावल्यानंतरही त्यांनी दाद दिली नाही. परिणामी गत सहा वर्षांत त्यांच्याकडे ३२ लाख ७५ हजार २१४ रुपयांचा कर थकीत आहे.

chabra groupincome taxNMC