नरेंद्र मोदी यांनी घेतली सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली, दि. ९ : नरेंद्र मोदी यांनी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी मोदींनी पद आणि गोपिनियतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यांला अनेक देशांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली आहे.

यावेळी पीएम मोदींनी नवीन सरकार मध्ये एनडीएच्या विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली होती, त्यानंतर हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील ७१ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७२ वे मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मोदी ३.० कॅबिनेटमध्ये आज एकूण ३० कॅबिनेट मंत्री, ५ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्यमंत्री शपथ घेतली.

नवीन मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील ६ जणांची वर्णी लागली आहे. नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रतापराव जाधव यांना राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) पद तर रामदास आठवले, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ राज्यमंत्री देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही नेत्याची मंत्रीपदी नियुक्ती झालेली नाही. त्यांना राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्याची तयारी भाजपाने दाखवल्याने नाराज होऊन त्यांनी मंत्रीपद नाकारले आहे.

याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राष्ट्रवादीला आमच्याकडून एक स्वतंत्र प्रभार मंत्रीपद ॲाफर करण्यात आले होते. प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल देखील झालं होतं. पण ते कॅबिनेट मंत्री राहीले आहेत. त्यांना राज्यमंत्री करता येणार नाही, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मत होतं. म्हणून यावेळेस केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करता आला नाही. पण भविष्यात त्यांचा विचार होईल. “

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शेजारील देश आणि इतर देशांतील अनेक नेते सामील झाले. यात श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, नेपाळचे पंतप्रधान पुष्पाजी. कमल दहल ‘प्रचंड’, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांनी उपस्थिती लावली.

केंद्रीय निवडणूक आयोगकेंद्रीय मंत्रिमंडळपंतप्रधान नरेंद्र मोदीमहामहीम राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू