नक्षल्यांनी रस्त्याचे बांधकाम करत असलेल्या वाहनाची केली जाळपोळ…

भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत असलेल्या कुचेर, इरपनार परिसरातील घटना...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २१ जानेवारी : भामरागड तालुक्यात असलेल्या धोडराज पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत असलेल्या कुचेर, इरपनार या ठिकाणी नवनिर्माण रस्त्याचे बांधकाम करीत असलेल्या ठिकाणी

१५ ते २० नक्षल जाऊन कामगारांना काम करण्यास बंदी घालून सर्व वाहने एकत्र करून जाळपोळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.

यामध्ये ९ ट्रॅक्टर, २ जेसीबी, एक ग्रेडर गाडीची जाळपोळ आज दि. २१ जानेवारी रोजी दुपारी २.०० वाजताच्या सुमारास वाहनांची एकत्रित जाळपोळ केल्याची प्राथमीक माहिती सूत्रांनी दिली आहे.

जाळपोळ घटनेसंदर्भात भामरागड पोलीस विभागाला विचारणा केली असता सदर घटनेला दुजोरा दिला असून घटनेची माहिती प्राप्त झाली आहे. सदर घटनेत कोणकोणत्या वाहनाची जाळपोळ केली गेली व किती नुकसान झाले हे चौकशीत समोर येणार असल्याचे सांगितले आहे.

पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत कुचेर आणि इरपनार दरम्यान रस्त्याचे बांधकाम युद्ध पातळीवर कंत्राटदार (पेटी कॉन्ट्रॅक्टर) वनकर नामक करीत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. पोलिसांच्या चौकशीअंती स्पष्ट होणार आहे.

गेल्या डिसेंबर २०२१ मध्ये २६ नक्षल्यांना पोलिसांनी खात्मा केला होता. त्यात नक्षल दलमचे झोनल सदस्य मिलिंद तेलतुंबडेसह अन्य मोठ्या कॅडर सदस्यांचा समावेश होता. त्यानंतर नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला असल्याचे बोलले जात असले तरी पुन्हा नक्षल्यांनी कुचेर आणि इरपणार परिसरात वाहनाची जाळपोळ केल्याने ग्रामीण भागात तसेच जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

lead news