मृतांच्या वृत्त कामगारांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत: कामगार मंत्री हसन मुश्रीफ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पुणे : जिल्ह्यातील येरवडा इथं आज एका बांधकामावर झालेल्या नऊ कामगारांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत शासनातर्फे देण्याचं राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलं.

असे अपघात होऊ नयेत यासाठी बिल्डरांनी आवश्यक ती खबरदारी घेणं जरुरीचं असून बांधकामावर घेताना कोणताही कामगार हा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कडे नोंदणीकृत असायलाच हवा असं बंधनकारक करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

जखमींच्या औषधोपचाराचा खर्चाबाबत तसंच मृत कामगारांचे शव त्यांच्या मूळ गावी बिहारला पाठवण्यासाठी संबंधित बांधकामाच्या कंत्राटदाराला कामगार आयुक्तांद्वारे आदेश देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

हे देखील वाचा : 

धक्कादायक!! बांधकाम मजुराची केली हत्या अन् पोत्यात भरून फेकला मृतदेह!

धक्कादायक! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असतानाच महिलेची प्रसूती

 

Hasan Mushriflead news