प्रजासत्ताक दिनानिमित्त एका युवतीने भारतातील २६ वैशिष्ट्यांची साकारली रांगोळी….

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सोलापूर, दि. २६ जानेवारी : प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून सोलापूर येथील युवा कलाकार कु. प्रणोती औदुंबर गोरे हिने अभिमानस्पद अशा भारतीय वैशिष्ट्यांची रांगोळी साकारली आहे.

भारत हा वैशिष्ट्यपूर्ण देश आहे आणि याचेच रंगमय रूप या कलाकृतीतून पहावयास मिळते. २६ जानेवारी प्रमाणेच २६ खास विविधतेनेने नटलेला भारत म्हणजे ही रांगोळी असे त्यांनी सांगितले. ४ × ३ फूट आकार असणाऱ्या या रंगोळीमध्ये प्रामुख्याने शेती, भारतीय रेल्वे, गुढीपाडवा, किल्ला, भारतीय ध्वज, नारळाचे झाड, मसूर, लाल किल्ला, तबला, पतंग, गणेश, राजस्थानी छत्री, क्रिकेट खेळ, मयूर पक्षी, कमळ, होडी, सैनिक स्मारक, अशोकचक्र, तुतारी वादक, वीज निर्मिती, कुतुबमिनार, जलसंपत्ती, बुद्धसाधना, पणती, स्त्री, हवामान इ. दर्शविल्या आहेत. रंगांमधून भारत देशाला दिलेली ही कौतुकास्पद सलामीच आहे.

हे देखील वाचा : 

समुद्रकिनार्‍यावर आढळले भलेमोठे मृत कासव

देशभरातून 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर

lead newspranotirangoli