लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई प्रतिनिधी 14 जुलै :- राज्यात नव्याने स्थापित झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने नागरिकांना आश्वासन दिल्याप्रमाणे इंधन कर कमी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपये तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज झालेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत एकनाथ शिंदे यांनी इंधनावरील करकपातीची घोषणा केली. पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केल्याने सरकारी तिजोरीवर ६००० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
मात्र, त्यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच यापुढील काळातही राज्य सरकार राज्यातील जनतेला दिलासा देणारे निर्णय घेईल, असेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.आज मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेलचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.