पोलीस- नक्षल चकमक; कमांडर वासूसह दोन महिला नक्षली ठार, घटनास्थळी नक्षल्यांचा शस्त्रसाठा हस्तगत’

घातपात करण्याचा बेत सी- ६० जवानांनी उधळून लावला .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि १३ : नक्षल्यांचा सध्या ‘टीसीओसी’ कालावधी सुरु असून या दरम्यान  घातपात करण्याच्या तयारीत असलेल्याची माहिती सी- ६० पथकाला होताच नक्षल्यांचा कट उधळून लावत जवानांनी आज सोमवारी (दि. १३) रोजी चोख प्रत्युत्तर देत तीन नक्षल्यांना कंठस्नान घातले. मृतांमध्ये पेरिमिली दलमचा प्रभारी व नक्षल्यांच्या विभागीय समितीचा कमांडर वासू याच्यासह दोन महिला नक्षलींचा समावेश आहे.

पेरिमिली दलमचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगलात तळ ठोकून असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी विशेष अभियानचे अप्पर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी- ६० जवानांच्या दोन तुकड्या नक्षलविरोधी अभियान राबविण्यासाठी रवाना केल्या. पोलिस त्या परिसरात शोध मोहीम राबवीत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, सी-६० जवानांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

चकमक थांबल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे एक पुरुष आणि २ महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. पेरिमिली दलमचे प्रभारी आणि विभागीय समितीचा कमांडर वासू याचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले आहे. इतर दोन महिला नक्षल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

हे देखील वाचा,

 

अप्पर पोलिस अधीक्षक यतीश देशमुखपोलिस अधीक्षक नीलोत्पलपोलीस महासंचालक रश्मी शुक्ला