सरळगावातील साईभक्त शांताराम विशे यांचे निधन; मुलीने दिली मुखाग्नी!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुरबाड दि. १६ नोव्हेंबर : सरळगाव जवळील कुंभे पाडा (नागाव ) रहिवाशी साईभक्त कै. शांताराम लक्षमण विशे (विशे मामा) यांचे आज वयाच्या ५५ व्या वर्षी उपचारादरम्यान ठाणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्य झाला.

एक स्वाभिमानी बाणा , कितीही मोठं संकट आलं तरी कोणासमोरही न झुकणार, परिस्थितीवर मात करणारे प्रसन्न व्यक्तमत्त्व, रांजल्या गांजल्यांसाठी नेहमी आधार स्तंभ म्हणून उभा राहणारे, अत्यंत परोपकारी, मार्गदर्शक, समाजशील, संवेदनशील समुपदेशक, कोणत्याही कठीण परिस्थितीत कसे समोरे गेले पाहिजे, याचे धडे देणारे कै.विशे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुली, नात, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच मुरबाड परिसरात त्यांचे आप्त स्वकियांमध्ये शोककळा पसरली आहे.

दरम्यान, शांताराम विशे यांच्यावर आज संध्याकाळी कुंभे पाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची धाकटी मुलगी कू. करुणा शांताराम विशे हिने मुखाग्नी दिला. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गडचिरोली सी -६० पोलीस जवानांचा गृहमंत्र्याच्या हस्ते गौरव , मर्दनटोला येथिल कामगिरीचे केले कौतुक.

गडचिरोलीत ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करणार – पोलीस अधीक्षक

Manoj Satvi