लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई, 9 ऑगस्ट 2023 : ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. मुंबईतील एशिअन हार्ट इंस्टिट्यूटमध्ये वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुणे वरून मुंबईला एका बैठक यासाठी येत असताना सकाळी हार्टअॅटक आला त्यानंतर वांद्रे येथील एशिअन हार्ट हाॅस्पिटल येथे अॅडमिट केलं होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
हरी नरके यांच्या निधनाने समता चळवळीचा आघाडीचा शिलेदार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. हरी नरके हे महात्मा फुले साहित्याचा अभ्यास आणि संशोधन, व्याख्याते म्हणून परिचित होते. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. हरी नरके यांची ‘महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन’ आणि ‘महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा’ या दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार, त्यांचं कार्य सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोवण्यात हरी नरके यांचा मोठा वाटा राहिला. याच आठवड्यात हरी नरके यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होतं. मात्र त्या आधीच त्यांची प्राण ज्योत मालवल्याने पुण्यातील साहित्य आणि डाव्या चळवळींच्या वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :-