धक्कादायक!! बांधकाम मजुराची केली हत्या अन् पोत्यात भरून फेकला मृतदेह!

वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहरातील खळबळजनक घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वर्धा , दि. ४ फेब्रुवारी : जिल्ह्यातील आष्टी (शहीद) येथील नवीन वस्ती परिसरात आज सकाळच्या सुमारास पोत्यात बांधून असलेला मृतदेह गावातील नागरिकांना आढळून आल्याने आष्टी शहरात खळबळ उडाली आहे. पोत्याचा काही भाग फाटला असल्याने हा मृतदेह नागरिकांना दिसून आला.  मृतदेह बांधकाम मजुराचा असून त्याची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. मृतदेहाची ओळख पटली असून मृतकाच्या घरापासून अगदी ५० मीटर अंतरावर पोत्यात भरून मृतदेह फेकण्यात आला आहे. घातपात करीत मृतदेह पोत्यात भरून विल्हेवाट लावल्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून दूर फेकण्यासाठीचा प्रयत्न झालाय. पण वजन जास्त असल्याने मध्येच ठेऊन पळ काढला असावा असा कयास लावला जात आहे. मृतकाचे नाव जगदीश भानुदास देशमुख असे आहे. जगदीश हा गवंडी कामगार असून दारुडा असल्याने घरातही वादविवाद करत असल्याची माहिती आहे.नेमकी हत्या कोणी व कोणत्या कारणासाठी केली असावी हे पोलीस तपासात समोर येणार आहे.

हे देखील वाचा  : 

व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा हे जागतिकस्तरावरचे होणार सर्वोत्तम ठिकाण

तिहेरी हत्याकांड प्रकरणात 5 जणांना जन्मठेप इतर निर्दोष

भोंदू बाबाने बविआच्या नेत्याला घातला गंडा

 

 

lead news