लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सांगली, दि. ४ फेब्रुवारी : मिरज शहरात प्रेमविवाह करणाऱ्या एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली असून या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
प्राप्त माहितीनुसार, योगेश लवाटे असे या प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाच नाव आहे. एक ते दीड महिन्यांपूर्वी मिरजेतील योगेश लवाटे याने भडकंबे तालुका वाळवा या ठिकाणी राहणाऱ्या तरुणीशी प्रेम विवाह केला. त्यानंतर दोन दिवसापूर्वी योगेश लवाटे व मुलीचे आईवडील नातेवाईक यांच्यात वाद विकोपाला गेल्याने हि बाब मिरज शहराच्या पोलीस ठाण्यात गेली.
त्यानंतर गुरुवारी रात्रीच्या सुमारास योगश घरी निघाला असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून योगेशवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात योगेश हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज शहर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून या घटनेचा अधिक तपास सुरु केला आहे.
हे देखील वाचा :
धक्कादायक!! बांधकाम मजुराची केली हत्या अन् पोत्यात भरून फेकला मृतदेह!
धक्कादायक! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असतानाच महिलेची प्रसूती