लोहखनिजाच्या वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडवा अन्यथा चक्काजाम आलापल्ली व्यापारी संघटनेचा ईशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी 30 ऑगस्ट :-  त्रिवेणी अर्थमुव्हर्सकडून लोहखनिजाची होणारी वाहतूक दिवसा बंद करा,ओव्हर लोड वाहतूक बंद करा,मार्ग खड्डेमुक्त करा,वाहतुकीसाठी बायपास मार्गाची निर्मिती करा आदी मागण्यांसाठी आलापल्ली व्यापारी संघटनेकडून अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक अहेरी यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.

त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीद्वारे सुरजागड मधील लोह प्रकल्प मधून जडवाहनाने लोहयुक्त दगड, चुरा दररोज ८०० ते १००० जड वाहनाणे एटापल्ली मद्दीगुडम आलापल्ली नागेपल्ली या मार्गावरून वाहतूक सुरु आहे. त्यामध्ये अनेक जड वाहन क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक करीत आहेत. त्यामुळे मद्दीगुडम आलापल्ली नागेपल्ली ते आष्टी पर्यंतचा पूर्ण मार्गावरमोठे मोठे जीवघेणे खड्डे पडलेले आहेत.

आलापल्ली ते नागेपल्ली रोडवर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यातच सर्व लोड, वाहनाचे धूर व्यापारांच्या दुकानात उडतो. त्यामुळे दुकानाचे नुकसान होत आहे. नागरिकांना खोकला आणि श्वसनाचे आजार बळावत चालले आहेत. रोडच्या आजूबाजूला वास्तव्याचे घरे आहेत. अहोरात्र दररोज ८०० ते १००० जड वाहन वाहतूक होत असल्याने शाळाकरी मुलांना सायकल, मोटर सायकल घेऊन चालण्याचे भितीमय वातावरण निर्माण झाले आहे. आलापल्ली व नागेपल्ली या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ४ शाळा, ८ हायस्कूल, ५ महाविद्यालय, १० अंगणवाडी, ३ इंग्रजी माध्यम शाळा आणि १ आय. टी. आय. असून एकूण ५००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सदर विध्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी आलापल्ली ते चंद्रपूर मेन रोड राज्य महामार्गाचा उपयोग करावा लागतो. या एकमेव मार्गावर जाणे- येणे करिता जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत एटापल्ली ते आष्टी मार्गावर अनेक अपघात झालेले असून अनेकदा जिवितहानी झाली आहे. तसेच अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरी सामान्य विद्यार्थी, जनमानसाची जिवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कुणाची? हा प्रश्न आलापल्ली व नागेपल्ली ग्रामस्थांना भेडसावत आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रक नेहमी उभे असतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी ग्रामपंचायत आलापल्ली व नागेपल्ली यांनी ग्रामसभा घेऊन कार्यवाही अहवाल प्रस्ताव दिलेला असून यासोबत सहपत्रीत करण्यात आले. तरी त्यानुसार कंपनीकडून कार्यवाही अपेक्षित झाली नाही. तर तक्रारीचे दिनांकापासून १० दिवसाच्या आत आलापल्ली ते नागेपल्ली रोड खड्डेमुक्त करण्यात यावी व जड वाहनांची वाहतूक सकाळी ०६:०० ते रात्रो ०९:०० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात यावे किंवा एक वेगळा गावाबाहेरून बायपास रस्ता तयार करण्यात यावे असे निवेदन संबंधितांना दिले आहे. अन्यथा आलापल्ली / नागेपल्ली सर्व ग्रामस्थ कंपनीचे वाहन वाहतूक होवू देणार नाही. व चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. असा इशारा आलापल्ली व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे.

हे देखील वाचा :-

टिपेश्वर अभयारण्यातील जखमी अस्वल परत नैसर्गिक अधिवासात.

 

@spgadchirolibad roadcollector gadchiroliGadchirolihevey vehicleinfogadchirolimpashokneteroad issuesurjagad project