लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बेळगाव : काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने काँग्रेस कार्यकारिणीची कर्नाटकातील बेळगाव येथे नव सत्याग्रह बैठक आयोजित करण्यात आली असून बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते व माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, अजय माकन आणि मुकुल वासनिक यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते या ऐतिहासिक बैठकीला उपस्थित होते.
सदर बैठकीत संविधानावर होत असलेला हल्ला, महागाई आणि भ्रष्टाचार व लकवर होत असलेला अत्याचार यासारखे मुद्दे उपस्थित करुन सरकारविरोधात आवाज उठविण्यासाठी काँग्रेसने गुरुवारी पदयात्रेसह १३ महिन्यांच्या राजकीय मोहिमेची घोषणा केली असून पक्षात मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात येणार असून ही प्रक्रिया लगेच सुरू करून पुढील वर्षभर चालेल. अशी घोषणा काँग्रेस कार्यकारिणीच्या म्हणजेच नव सत्याग्रह बैठकीत करण्यात आली.सदर बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले.
एक महात्मा गांधींवर तर दुसरा राजकीय होता. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पक्षाध्यक्ष व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सरचिटणीस जयराम रमेश आणि काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख आजपासून ‘जय बापू, जय भीम आणि जय संविधान’ अभियान २७ डिसेंबर २०२४ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘जय बापू, जय भीम आणि जय संविधान अभियान’ असेल. ते गाव, ब्लॉक, जिल्हा आणि राज्याराज्यात राबविण्यात येईल. या अभियानाचे नेतृत्व राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व करणार असल्याचेही वेणुगोपाल यांनी सांगितले. ते म्हणाले की, २०२५ हे वर्ष संघटनेच्या सुधारणेचे वर्ष असणार असून नेतृत्व करण्याची क्षमता व उत्तरदायीत्व या आधारावर पक्षात मोठे फेरबदल करण्याचे संकेत देण्यात आले.
हे ही वाचा,
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नामंकित इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश
आर्थिक सुधारणांचे जनक व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन