लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई डेस्क दि.०४ फेब्रुवारी : टायर कंपन्यांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याबाबत प्रतियोगिता आयोगाने टायर उत्पादकांनी कमी झालेल्या कच्च्या मालाच्या किंमतीचा लाभ ग्राहकाना न देता, ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी टायर उत्पादकांच्या विरुद्ध दंडात्मक कार्यवाही केली आहे.
याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने प्रतियोगिता आयोगाने केलेली कारवाई योग्य ठरविली आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक ग्राहकांनी या कंपन्यांकडून टायर्स खरेदी केले असून त्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे.
सदर प्रकरणी राज्यस्तरीय ग्राहक मंच द्वारे स्वाधीकारे चौकशी (Suo moto enquiry) करण्यात यावी अशी सूचना महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे राज्य ग्राहक मंच यांना केली आहे. ग्राहकांचा तपशील आयुक्त, वस्तु व सेवा कर माझगांव, मुंबई यांचेकडून घेण्यात यावा असे देखील आवाहन डॉ.गोऱ्हे यांनी केले आहे.
या कालावधीतील सर्व ग्राहकांना या टायर साठी वाढीव किंमत द्यावी लागली आहे. यामुळे सर्व टायर्स कंपन्यांकडुन ग्राहकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती राज्य अध्यक्ष ग्राहक मंच यांना लेखी पत्राद्वारे डॉ.गोऱ्हे यांनी केली आहे.
हे देखील वाचा :
सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ वर्गवारीत महाराष्ट्राचा चित्ररथ देशात प्रथम
धक्कादायक! प्रेमविवाह करणाऱ्या तरुणावर दोघांचा चाकूने प्राणघातक हल्ला