लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बीजिंग: तिबेटच्या स्वायत्त प्रदेशातील शिगाझे शहराजवळ मंगळवारी ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला. यात १२६ लोक ठार तर १८८ जण जखमी झाले आहेत. तेथील चांगसुओ टाउनशिपमध्ये बचावकार्य सुरू आहे. भूकंपग्रस्त स्थानिकांचा थंडीपासून बचाव करण्याचे तेथील सरकारपुढे मोठे आव्हान आहे.
भूकंपानंतर चीनने मंगळवारी माउंट एव्हरेस्टचा भाग पर्यटकांसाठी बंद केला. डिंगरी हे माऊंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प आहे. या निसर्गरम्य परिसरातील हॉटेल इमारती आणि आजूबाजूचा परिसराची कोणतीही हानी झालेली असून तेथील विद्युतपुरवठा खंडित झाला आहे
नेपाळ तसेच भारतातील बिहार, उत्तरप्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये तसेच दिल्लीतही भूकंपाचे धक्के जाणवले. मंगळवारी सकाळी ९.०५ वाजता तिबेटच्या स्वायत्त प्रदेशातील शिगाझे शहरातील डिंगरी काउंटीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणाने भूकंपाची तीव्रता ७.१ रिक्टर स्केल इतकी नोंदवली आहे.
नेपाळमध्ये भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक घराबाहेर पडले असून काब्रेपलांचोक, सिंधुपालचोक, धाडिंग व सोलुखुंबू जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. काही काळ लोकांनी रस्त्यालगतची झाडे आणि विजेचे खांब हादरताना दिसल्या. भूकंपामुळे घाबरून लोक घराबाहेर पडले. नेपाळ मध्ये भूकंपामुळे कोणतेही मोठे नुकसान किंवा मनुष्यहानी झालेली नाही.
उत्तर प्रदेश आणि दिल्लीलाही भारतीय वेळेनुसार सकाळी ६.३५ मिनिटांनी भूकंपाचे जोरदार हादरे बसले. बिहारमध्ये जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता ५.३ इतकी होती. भूकंपानंतर कडाक्याच्या थंडीतही लोक खबरदारी म्हणून घरातून बाहेर पडले.
हे ही वाचा,
गृहखात्याकडून छाननी झाल्यानंतर मंत्र्यांना खासगी सचिव आणि स्टाफ नेमता येणार