तहसिलदारसह नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; वाळू वाहतूक प्रकरणी लाच घेणं चांगलंच भोवलं

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावचे तहसीलदारसह नायब तहसिलदार आणि एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गोंदिया दि ७ : गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हातील गोरेगावचे तहसीलदार किसन भदाणे यांच्यासह नायब तहसिलदार नागपुरे आणि एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात ताब्यात घेतले आहे. तर या तिघांच्या विरोधात गोरेगाव पोलिसात गुन्हा नोंद झाल्याने महसुल विभागात हादरा बसला आहे .

या प्रकरणाची कारवाई अगोदर गोरेगाव तहसिल कार्यालयात करण्यात आली होती. त्यानंतर या सर्व संशयित आरोपींना पुढील तपास आणि कारवाई करिता गोंदिया येथील कार्यालयात आणण्यात आले आहे.

वाळू वाहतूक प्रकरणी लाच घेणं चांगलंच भोवलं: 

प्राप्त माहितीनुसार, गोरेगाव तालुक्यातील वाळू वाहतूक प्रकरणी गोरेगाव तालुक्यातील गिधाडी या गावातील एका फिर्यादीने तक्रार दिली होती. दिलेल्या या तक्रारीनुसार तहसीलदार भदाने यांनी नायब तहसीलदार नागपुरे यांच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार दिली होती. यात गोरेगावचे तहसीलदार किशन के. भदाणे, नायब तहसिलदार नागपुरे आणि गणवीर नामक एक खाजगी व्यक्तीचा समावेश आहे. हे प्रकरण उघडकीस येताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात या तिघांनाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे आणि कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर यापैकी खारोडे आणि खताळ यांना सध्या ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदेजिल्हाधिकरी गोंदियापोलीस अधिक्षक गोंदियामुख्यमंत्रीलाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया
Comments (0)
Add Comment