महाराष्ट्र- तेलंगणा राज्याच्या संपर्क तुटला…

प्राणहिता नदीच्या पुलाचा भराव वाहून गेल्याने अनिश्चित काळासाठी वाहतूक बंद...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 15 जुलै :-  गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील गोदावरी प्राणहिता नदीवरील पुलाने महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडले आहे. परंतु गेल्या पाच सहा दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यात सिरोंचातील मेडिगड्डा धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडल्याने प्राणहिता नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने पुलाचा मातीचा भरव वाहून गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र- तेलंगणा राज्याच्या संपर्क तुटला आहे. भराव वाहून गेल्याने दोन्ही बाजूची वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पाच-सहा दिवसापासून संततधार पाऊस होत असल्याने नदी नाले तुडुंब भरून जात होते . आणि त्यातही सिरोंचातील मेडिगड्डा धरणही तुडुंब भरल्याने मेडिकट्टा धरणाचे संपूर्ण दरवाजे खुले केल्याने पाण्याचा प्रवाह वाढ झाली होती. त्यामुळे प्रशासनाने हजारो नागरिकांना स्थलांतरित केले आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या मुख्य महामार्गाला जोडण्यात येणाऱ्या प्राणहिता नदीवरील पुलाचा मातीचा भराव पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तेलंगणा राज्याशी संपर्क तुटला आहे. याशिवाय महामार्गावर जाणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्क करण्यात आले आहे. पुल आणि महामार्ग यांच्या मध्ये बहरव वाहून गेल्याने मोठा खड्डा पडला आहे. या खड्यामुळे कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने दखल घेतली आहे. त्यामुळे या खड्ड्याला मातीचा भराव केल्याशिवाय सदर महामार्ग सुरू होणार नाही.

bride damagekaleshwar roadsironchasironcha raintelnagana road