परळी – बीड – नगर रेल्वे मार्गावर प्रवाशी घेऊन रेल्वेचे चाचणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बीड, दि. ३ फेब्रुवारी : बीड जिल्हा वासियांच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असलेल्या परळी- बीड- अहमदनगर रेल्वे मार्गावर आज दि . ३ फेब्रुवारी रोजी पहिल्यांदाच अहमदनगर ते आष्टी प्रवासी घेऊन रेल्वेची चाचणी करण्यात आली. अहमदनगर ते आष्टी या ६७ किलोमीटर अंतरावर पहिल्या पॅसेंजर रेल्वे गाडीची चाचणी घेण्यात आली आहे .

याचा अधिकृत शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन प्रणालीद्वारे उद्या शुक्रवारी होणार असल्याची माहिती आहे. नगर परळी रेल्वे मार्गाचे एकूण लांबी २६१ किलोमीटर आहे. अहमदनगरपासून आष्टीपर्यंत ६७ किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले होते. अखेर आज पहिल्यांदाच अहमदनगर ते आष्टी प्रवाशांना घेऊन रेल्वेची चाचणी घेण्यात आली.

हे देखील वाचा : 

“या” बिल्डरच्या बॉडिगार्ड्सकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण

अल्पवयीन मुलीच गर्भपात प्रकरण : डॉ. कदम यांच्या कारनाम्यानंतर मंत्रालय अलर्ट

lead news