लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चुरचुरा गावाला लागून जवळपास १० ते १२ किमी लांबीचे जंगल आहे. या जंगल परिसरात गावे नाहीत. त्यामुळे हत्तीसाठी हे जंगल अगदी सुरक्षित आहे. त्यांना या भागात अगदी मनसोक्त्त वावरता येते. त्यामुळे कळपाने पुन्हा या भागात एन्ट्री केलेली असावी, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील आणू पोर्ला वनपरिक्षेत्रात हत्त्तींचा कळप चुरचुराच्या जंगलात स्थिर झाला आहे. ह्या कळपात नव्या पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे हत्तींची भ्रमंती कमी झाली. सध्या महिनाभरापासून कळपाने या परिसरात ठाण मांडलेले आहे. आता कळपातील जंगली हत्तीची संख्या २९ झालेली आहे.
रानटी हत्तींचा कळप मागील आठवड्यात पाल नदी ओलांडून देलोडाच्या जंगलात गेला होता. हा कळप सिर्सी जंगलातून पुन्हा कोजबी परिसरात वावरत होता; कळप आरमोरी तालुका ओलांडून पुन्हा कुरखेडाच्या जंगलात जाणार असे शेतकऱ्यांना वाटत होते; परंतु तसे झाले नाही याच परिसरातील डार्ली, बोरी परिसरातून पुन्हा देलोडाच्या जंगलातून चुरचुराच्या जंगलात आला.
सध्या याच जंगलात हत्तींच्या कळपाचा वावर आहे. या भागातील धान पिकाची नासधूस कळपाकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. हत्तींचा कळपाला हुसकावून लावणे शक्य नसले तरी त्याच्यावर नियंत्रण ठेवता येते. पोर्ला वन परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह हुल्ला पथकाने यावर उपाययोजना कराव्या, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
हे देखील वाचा ,