औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या अपेक्स अथॉरिटीची पहिली बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलेले मुद्दे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 7 जुलै :- बंगलोर – मुंबई कॉरिडॉरचे काम योग्य जागा न मिळाल्याने सुरू झालेले नाही. मात्र आता कोरेगाव सातारा येथील जागा या कॉरिडॉरसाठी देण्यात येईल व जमीन संपादन सुरू करण्यात येईल. वाराणसी – मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचे काम व्हावे यादृष्टीने मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेला अनुमोदन. हे काम झाल्यास या कॉरिडॉरमधील परिसराचा विकास होईल.राज्यातील टेक्सटाइल पार्क, मेडिकल पार्क आणि बल्क ड्रग पार्क यांना केंद्र शासनाने लवकरात लवकर मान्यता दिल्यास या पार्क्सचे काम जलद गतीने सुरू होऊन राज्याला आणि पर्यायाने केंद्रालाही मोठा फायदा होईल.

औरंगाबाद येथील शेंद्रा बिडकीन येथील ऑरिक सिटीला उद्योजक आणि गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. याठिकाणी 5542 कोटींची गुंतवणूक आली असून 375 एकर भूखंड उद्योगांना देण्यात आले आहेत. याठिकाणी 3 लाख लोकांना रोजगार मिळेल. पंतप्रधानांनी देखील या प्रकल्पाचे कौतुक केले आहे

दिघी माणगाव औद्योगिक क्षेत्र देखील विकसित करण्यात येत असून एनआयसीडीसी कडून त्वरित मदत झाल्यास विकासाला चालना मिळेल. याठिकाणी 85 टक्के जमीन संपादन पूर्ण झाले आहे. कराराची तांत्रिक प्रक्रिया केंद्राकडून लवकर पूर्ण झाली तर तीन महिन्यात उर्वरित भू संपादन पूर्ण करता येईल.

CM eknath shindegovrnerof MaharashtraMumbai mantaralay