रांगी येथिल कोविड समितीने मोहिम राबऊन बिनामास्क दुकानावर बंदी असतांनाही बंद शटर धंदा करनार्या व्यावसायिकावर थोपटला दंड!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि.२७ एप्रिल : धानोरा तालुक्यातिल रांगी येथे अनेक व्यावसायिकाचे दुकान आणि कार्यालय व बँक असल्याने लोकांची वरदळ सदैव असते. सध्या रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रात रँपीट चाचणी सुरु असुन कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण प्रस्थापित करन्याकरिता आज दिनांक २७/४/२१ ला मंगलवारला काेविड १९ बाबत माेहीम राबवली असता बरेच दुकानदार हे अर्धे सेटर उघडून व्यवसाय करीत असल्याचे प्रत्यक्ष स्थळी समितीला निर्दशनास आले असल्याने त्याच्यावर दंडात्मक कारवाई करन्यात आली तसेच रस्त्याने बिनामास्क वापरणाऱ्या नागरिकानवर दंडात्मक कारवाई करन्यात आली.
रांगी येथिल शिवाजी चौक,टि पाँईट ,गणेश नगर, कुंभार मोहला ई. ठीकानी समिनीने प्रत्यक्ष कोरोनाचे आवश्यक काळजी घेण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली . रांगी येथे कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता सर्वानिच मास्कचा वापर करावा ,नेहमी हात स्वच्छ धुवावे सानिटाँझरचा वापर करावा ,सुरक्षित अंतर ठेवावे असे आवाहन कोविड १९ समितीचे सचिव बुराडे यांनी केले असून सर्वानी एकमेकाना सहकार्य करण्याची विनती केली .
यावेळी कोविड समितिचे अध्यक्ष साै. फालेस्वरी प्रदिप गेडाम ,एस. के. खाेब्रागडे तलाठी , हिचामी आरोग्य साय्यक, आर .एम .काटेंगे पाे. पा .सचिव.पांडुरंग बुराडे समिति सचिव,व ग्राम पंचायत कर्मचारी हजर हाेते हि सर्व माेहीम ३ वाजे पर्यत पार पाडली व सर्वाचे सहकार्या बदल आभार मानले.