दुचाकी स्वाराला झाले बिबट्याचे दर्शन; प्रसंगवधानाने वाचले प्राण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 गडचिरोली दि,२१ सप्टेंबर : मुलचेरा तालुक्यात येत असलेल्या येल्ला-लगाम मार्गावरुन दुचाकीवरून जाताना एका युवकाला  आज दुपारच्या सुमारास बिबट्या रोड वरच दर्शन झाले.त्यामुळे  दुचाकीवरील युवक व त्याच्या मागे बसलेली महिला प्रसंगवधानाने बचावली आहे.

आज दुपारी ३:३० ते ४:०० च्या सुमारास येल्ला येथील आनंदराव रामटेके हा युवक व एक महिला कामानिमित्ताने लगामकडे दुचाकीने निघाले होते.या मार्गावरून जातांना एका बाजूला असलेल्या धानाच्या शेतांकडुन बिबट्याने दुचाकीवर समोर रोडवर आल्याने  वेळीच प्रसंगावधान राखून रामटेके यांनी दुचाकीचा वेग वाढवल्याने समोर निघून गेल्याने सुखरूप बचावले.

त्याचवेळी बिबट्याने कापसाच्या शेतातून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली असून शेतात बिबट्याचे पंजाचे ठसे स्पष्टपणे दिसत आहे.मागील पंधरवड्यात येल्ला येथील टेकूलवार या शेतकऱ्याचा बिबट्याने बळी घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून.या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..

हे देखील वाचा,

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार,

नक्षल सदस्याला बॅनर लावतांना पोलिसांनी केली अटक 

Clead stori M Uddhav Thakareysanjay mina