लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बुलढाणा, दि. १६ फेब्रुवारी : एखाद्या गोष्टीची लालसा तुम्हाला चांगलाच आर्थिक भुर्दंड देऊ शकतो. याचा प्रत्यय नेमकाच बुलढाणा जिल्ह्यात आला आहे. हैदराबादच्या एका इसमाला सहा लाखाने गंडवले गेले आहे. त्याचं झालं असं की, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून काही भामट्यांनी सुलेमानी पत्थर त्यांच्याकडे उपलब्ध असल्याचे सांगत, हैदराबादच्या एका इसमाला गवसणी घातली, सुलेमानी पत्थर मुठीत किंवा जवळ ठेवल्याने शरीराला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही अशी अंधश्रद्धा आहे.
याच अंधश्रद्धेच्या पोटी हैदराबाद येथून एक इसम हा सुलेमानी पत्थर घेण्याकरता थेट महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाला आहे. मात्र येथे खामगाव शहरात काही भामट्यांनी पहिल्यांदा पाच लाख व नंतर आणखी एक लाख असं सहा लाखाने या इसमास गंडवले, व नकली सुलतानी पत्थर त्याला देऊन फसवणूक केली. यानंतर शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महाशयांनी पोलीस स्थानक गाठलं. त्यानंतर या भामट्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आणि तीन जणांना अटक झाली आहे.
हे देखील वाचा :
भीषण अपघात! कारची ट्रक्टरला धडक, धडकेत ४ जणांचा जागीच मृत्यू तर ९ जण गंभीर
दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्राची सुविधा.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लहरी यांना श्रद्धांजली