आजोबाचा निशाणा चुकला गोळी लागली महिलेला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई, दि. ८ ऑक्टोंबर : वसईत शुक्रवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका आजोबांनी संतापाच्या भरात रस्त्यांवरील भटक्या कुत्र्याना आपल्या एअरगनने गोळी झाडली, पण नेम चुकला आणि रस्तावरून जाणाऱ्या एका गरीब महिलेला गोळी लागली.

याबाबतची हकीगत अशी, वसई तालुक्यातील गिरीज गावात लेन भाट स्टॉप जवळील माविको बंगल्यात राहणारे जेष्ठ नागरिक मायकल जॉर्ज कूटीनहो यांच्या घरातील पाळीव कुत्र्याला रस्त्यावरील भटके कुत्रे चावले. त्यावेळी या आजोबांचा राग अनावर झाला. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या एअरगनने भटक्या कुत्र्यावर गोळी झाडली. पण नेम चुकला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या सरिता संदीप भैर या महिलेच्या मांडीत ही गोळी लागली. जखमी सरिता हिला जवळच असलेल्या कार्डियल ग्रेसीस या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सरिता ही घरकाम करून आपला उदरनिर्वाह चालवते. ती सायकल वरून घरी जात असताना तिला ही गोळी लागली आणि ती जखमी झाली.

आजोबांकडे जी एअरगन आहे त्याला लायसन्स नाही आहे. त्यामुळे या आजोबांवर कोणती कलमे लावावीत याचा अभ्यास विधी विभाग करीत आहे. दरम्यान या आजोबांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचेवर भादवि ३३६,३३८, अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हे देखील वाचा : 

आणखी एका ठाकरेंची होणार राजकारणात एन्ट्री ?