लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
रशिया-युक्रेन युद्ध बाबत अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियन राष्ट्रप्रमुख व्लादिमीर पुतिन यांच्यात चर्चा झाल्याच बोललं जातय. दोघांमध्ये युद्धविराम करण्याचा फॉर्म्युला ठरला असल्याचही सांगितलं जाते. परंतु रशियाने अशी कुठलीही चर्चा झाली नसल्ल्याचे सांगितले. तसेच ही बातमी बाहेर येताच राष्ट्रपती पुतिन यांनी बॅटल ऑफ डोनेस्कला अजून गती दिलीय. पूर्व युक्रेनच्या काही शहरांवरील हल्ल्याचा वेग वाढवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर युरोपातील देश आणि डेमोक्रॅट्स एक शक्यता वर्तवली होत, ती आता खरी होणार असं दिसू लागलय. पुतिन यांनी कुठलाही सामंजस्य करार करण्याआधी युक्रेन विरुद्ध एक रणनिती बनवली आहे. रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ले वाढवले आहेत. युक्रेनच्या डोनेस्क प्रांत ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्याने चाल केली आहे.
10 नोव्हेंबरला ट्रम्प आणि पुतिन यांच्यात फोनवर चर्चा झाल्याच वृत्त आहे. ट्रम्प आणि पुतिन यांच्यात युद्धावर तोडगा काढण्याची चर्चा झाली. या चर्चेनंतर रशियाने युक्रेनवरील हल्ले वाढवले आहेत. रशियन सैन्याने कुरोखोवोमध्ये FAB-1500 बॉम्बने, रशियाच्या 8 Tu-95 बॉम्बर्सनी युक्रेनच्या अनेक शहरांवर मिसाइल आणि बॉम्बने हल्ले केले. रशिय सैन्याने पुन्हा एकदा ओडेसावर मोठा हल्ला केला. रशियाच्या MiG 31 स्क्वाड्रनने सुद्धा युक्रेनी शहरांवर हवाई हल्ले केले. कीवमध्ये हल्ल्याच्या भितीने लोकांनी अंडरग्राउंड रेल्वे स्टेशनमध्ये आसरा घेतला.
रशियन सैन्याने कुराखोवोला तिन्ही बाजूंनी घेरलय. कुराखोवो डोनेस्कमध्ये आहे. कुराखोवोपासून रशियन सैन्य 3 किलोमीटर दूर आहे. कुराखोवोवर आर्टिलरी, मोर्टार आणि ड्रोनने हल्ले सुरु आहेत. कुराखोवोमध्ये 700 ते 1000 लोक उरले आहेत. बाकीचे लोक शहर सोडून गेले आहेत. नागरी सुविधा नष्ट झाल्याने उरलेले लोक बेसमेंटमध्ये दिवस काढत आहेत.