महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायींनी हजारो मेणबत्त्यांनी उजळवले चवदार तळे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड, दि. ६ डिसेंबर : महाड तालुक्यातील असलेल्या भीम अनुयायींनी आज दिनांक ६ डिसेंबर रोजी महाड येथील प्रसिद्ध चवदार तळे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरीनिर्वाण झाले. उद्धारकर्त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायी दादरच्या चैत्यभुमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. परंतु सर्वच भीम अनुयायांचे  जाणे शक्य नसते. याचा विचार करून बाबासाहेबांची कर्मभुमी असलेल्या महाडच्या चवदार तळ्यावर गेली अनेक वर्ष येथील दलित मित्र खांबे गुरुजी ट्रस्टच्या माध्यमातुन हा अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करीत असुन या निमित्ताने महाडच्या चवदार तळ्यावर मेणबत्या लावण्यात आल्या. तसेच बुद्ध वंदना घेण्यात आली आणि दोन मिनिट स्तब्ध उभे राहून येथील भीम अनुयायींनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमात महाड आणि परीसरातील शेकडो आंबेडकरी अनुयायी या वेळी महामानवाला अभिवादन करण्यासाठी चवदार तळ्यावर उपस्थित होते.

 

 

 

 

हे देखील वाचा : 

कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी आता साडेतीनशे रुपयांत !!

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका!.. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती

संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करा .म.रा. पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांचे प्रतिपादन..

 

lead news