पंचगंगा नदीपात्रात हजारो मृत माशांचा मोठा खच…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी : पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे नदीपात्रात हजारो मृत माशांचा मोठा खच सुर्वे बंधार्‍यानजीक पडला आहे.

गेल्या अनेक वर्षांत प्रथमच पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मासे मृत झाल्याचं परत उघड झाल्याने नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

काही काळ सुमारे अर्धा किलोमीटर नदीचं पात्रच या माशांच्या थरानं दिसायचंच बंद झालं होतं. मात्र पंचगंगा नदीचं प्रदूषण पुन्हा एकदा गंभीर बनलं आहे. इतकी भयाण परिस्थिती असतानाही प्रशासनानं पंचनामा करण्यापलीकडे काही केलं नाही.

आज उशिरापर्यंत हे मृत मासे पाण्याबाहेर काढण्याचीही तसदी घेतली नव्हती. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणाचं कसलंच सोयरसूतक प्रशासनाला नसल्याचंच पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

हे देखील वाचा : 

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा..

गरिबांचा फ्रिज म्हणजे शाडूच्या मातीचा माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध…

भावी पिढीच्या निर्माणासाठी संतांची शिकवण ही काळाची गरज – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

 

lead newspanchagana river pollution