राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तीन बडे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर दि ७ :जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील एका बियर शॉपच्या परवानगीसाठी एका अर्जदाराने अर्ज  केला होता. मात्र ६ महिने लोटूनही यावर कुठलीही प्रक्रिया पुढे झाली नाही. परिणामी, या बाबत अर्जदाराने विचारणा केली असता, अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे आणि कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी 1 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर अर्जदाराने या बाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आणि सापळा रचत हे प्रकरण उघडकीस आणले.  

चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षकासह तीन बडे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. 1 लाखांच्या लाचेची मागणी करणे या तिघा अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले आहे.

या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे आणि कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर यापैकी खारोडे आणि खताळ यांना सध्या ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

acb chandrapur trapdm chandrapursp chandrapur
Comments (0)
Add Comment