एका महिन्यात तब्बल 26 आत्महत्या! बघा कुठ तर

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घटना.

26 जणांमध्ये 10 महिला तर 16 पुरुषांचा समावेश आहे.

आत्महत्यांमध्ये सावकारी कर्ज आणि व्यसनाधीनता ही प्रमुख कारणं समोर येतायत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सोलापूर डेस्क ७ डिसेंबर :- ऐका कडे केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे तर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एका महिन्यात तब्बल 26 आत्महत्या झाल्या आहेत. त्यातील बहुतांश व्यक्ती या तरुण आहेत. सावकारी कर्जाचा पाश आणि व्यसनाधीनता हे प्रमुख कारण या आत्महत्येचे बाबतीत असल्याचं बोललं जातंय. बार्शीतल्या या आत्महत्यांची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. बार्शी तालुक्यातील 26 आत्महत्यांपैकी 21 घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. तर, 5 प्रकरणांची नोंद झाली नाही.

आत्महत्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे. 26 जणांमध्ये 10 महिला तर 16 पुरुषांचा समावेश आहे. आत्महत्या करणाऱ्यांच्या वयोमानाचा आढाव घेतला असता त्यातील 10 जण हे 20 ते 40 वयाचे आहेत. आत्महत्यांमध्ये सावकारी कर्ज आणि व्यसनाधीनता ही प्रमुख कारणं समोर येतायत. जर अशा कारणांमुळे महिन्याभरात इतक्या आत्महत्या सतत होत राहतील तर प्रश्न गंभीर आहे.

solapur former delth