लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : नक्षलवादी चळवळीत तब्बल ३२ वर्षे कार्यरत असलेले नरसिंग या जहाल दोन नक्षलवाद्यानी गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षलवादी चळवळ पुन्हा एकदा पोकळी झाल्याचे निष्पन झाले आहे.
एरिया कमिटी मेंबर रामसू दुर्ग पोयाम ऊर्फ नरसिंग (५५, रा. गट्टानेली, ता. धानोरा) व दलम सदस्य रमेश शामू कुंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित (२५, रा. वेडमेट्टा, जि. नारायणपूर (छत्तीसगड) अशी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नावे असून दोघांवर एकूण आठ लाखांचे बक्षीस होते. मागील काही वर्षांपासून नक्षलवादाविरोधात पोलीस दलाकडून आक्रमक धोरण रबवण्यात येत आहे. सोबतच प्रशासनाकडून आत्मसमर्पितांसाठी विविध योजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे
नक्षलवाद्यांचा आत्मसमर्पणाकडे कल वाढलेला आहे.
दरम्यान, २० डिसेंबरला १९९२ पासून नक्षलवादी चळवळीत सक्रिय असलेला जहाल नक्षलवादी नरसिंग आणि रमेश कुंजाम या दोघांनी गडचिरोली पोलीस दलापुढे आत्मसमर्पण केले. दोघांवरही खून, जाळपोळ, चकमक प्रकरणी डझनभर गुन्हे दाखल आहेत. यातील रामसू दुर्गं पोयाम ऊर्फ नरसिंग हा १९९२ पासून नक्षलवादी चळवळीत आहे. १९९२ मध्ये तो टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला. १९९५ मध्ये काकुर दलममध्ये राहून सन १९९६ पर्यंत नक्षलवाद्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना सुरक्षा देण्याचे काम तो करीत होता. पुन्हा तो टिपागड दलमसाठी काम करू लागला. पुढे अबुजमाड एरिया (छत्तीसगड) येथे बदली होऊन २००१ पर्यंत त्याने पुरवठा टीममध्ये C-60 काम केले.
२०१० पासून तो कुतुल आणि नेलनार दलममध्ये एरिया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर कार्यरत होता.
त्याच्यावर १२ गुन्हे नोंद असून ६ चकमक, ५ खून, १ दरोडा प्रकरणात त्याचा सहभाग राहिलेला आहे. रमेश शामू कुंजाम हा २०१९ पासून माओवादी चळवळीत आहे. चेतना नाट्यमंच कुतुल दलममध्ये सदस्य म्हणून तो काम करत होता. यावेळी गुन्हेकृत्याची पडताळणी सुरू आहे. नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ ३७ बटालीयनचे प्रभारी समादेशक सुजीत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण झाले.