शेंडीच्या डोंगरावर चढलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू तर एक जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहमदनगर, दि. ३ फेब्रुवारी : शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या दोन तरुणांचा तोल जाऊन सुमारे एकशे दहा फूट खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला तर यातील एक तरुण जखमी झाला असून प्रस्तरारोहण करणारे इतर १२ जण सुखरूप आहे रापली, कातरवाडी, मनमाड शहरातील  तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन करत सर्वांना सुखरूप पायथ्याशी आणण्यात यश मिळवले.

अहमदनगर येथील असलेले इंद्रप्रस्थ टेकर्स या ग्रुपचे एकूण १५ सदस्य हे आज सकाळी मनमाड शहराजवळ असलेल्या हडबीची शेंडी, थमसप म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आले होते, या ग्रुपमध्ये ८ मुली तर ७ मुले होते यातील मुलांमध्ये दोन जण सराईत ट्रेनर होते, काल शेंडीच्या डोंगरावर पायथ्यापासून चढाई करण्यास सुरुवात केली. रात्री उतरण्यास उशीर झाल्याने ही दुर्घटना घडली.

यातील दोघे ट्रेनर असलेले मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ या दोघांनी ग्रुपमधील सर्वांची वर चढण्यासाठी असलेल्या जुन्या बोल्डिंगवर रोप लावला होता, रोपद्वारे सर्वजण सुखरूप शेंडीच्या डोंगरावर चढले सर्वांनी वर चढल्यावर आंनद व्यक्त केला मनसोक्त फोटो काढले, मात्र परतीच्या मार्गावर असतांना यातील ८ मुली ४ तरुण खाली उतरले, मात्र पाठीमागे थांबलेले दोघे ट्रेनर बोल्डिंग मधून रोप काढत असतांना वरचे बोल्डिंग दगड ठिसूळ असल्याने सटकल्यामुळे ट्रेनर असलेले मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ हे दोघे डोंगरावरून खाली कोसळले तर यांच्यासोबत असलेला प्रशांत पवार हा तरुण देखील जखमी झाला.

दोघे खाली पडत असतांना डोंगरावर जाणाऱ्या काही व्यक्तींनी बघितले त्यांनी तात्काळ फोन फिरवत रापली, कातरवाडी येथील तरुणांना बोलावून घेतले अपघात झाल्याचे लक्षात येताच सदर गावातील आणि मनमाड शहरातील तरुण घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करत यातील मृत तरुणांना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले,

जखमी प्रशांत पवार याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे तर यातील १२ तरुण तरुणींना रापली येथे माजी सरपंच संघरत्न संसारे यांच्या ग्रुपने आधार देऊन राहण्याची खाण्याची व्यवस्था केली.

हे देखील वाचा : 

नॅशनल टेलिव्हिजन फॅशन शो 2022 मध्ये गडचिरोलीच्या कलाकारांनी मिळविले अव्वल स्थान

 

lead news