कर आकाराच्या विरोधात लोकहित संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा

आरमोरी नगरपरिषद मोठ्या प्रमाणात कर आकारत असल्याने नागरिकात रोष शनिवारला सर्वपक्षीय सभेचे आयोजनात होणार निर्णय.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आरमोरी 8 जुलै :-  नगरपरिषद ने काही दिवसाआधी कर आकारणीच्या नोटीसा लोकांना बजावल्या आहेत ज्यात मालमत्ता कर, वृक्षकर,अग्निशमन कर, रोजगार हमी कर, उपयोगिता कर यासोबतच नगरपरिषदेच्या कुठल्याही प्राथमिक, माध्यमिक शाळा नसताना सुद्धा शिक्षण कराची अवाढव्य आकारणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या अतिरिक्त कराचा बोजा सर्व आरमोरीकर नागरिकांना भरावा लागणार आहे नुकताच कोविड च्या महासंकटातून सावरताना एक वर्ष होत नाही तर आरमोरीकरांवर हे अस्मानी संकट येऊन पडले आहे. उद्योगधंदे मंदावलेले, अवकाळी पावसामुळे होणारे शेतीचे नुकसान यामुळे सर्वसामान्य शेतकरी, मजूर, कामगार लोकांचे कंबरडे मोडलेले आहे त्यातच नगरपरिषद ने लावलेल्या या अवाढव्य करामुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत पडले आहेत.

नगरपरिषद च्या करात कपात करण्यात यावी यासाठी लोकहित संघर्ष समिती आरमोरी तर्फे दिनांक ९ जुलै २०२२ शनिवार ला वेळ दुपारी ठीक १२:३० वाजता साईदामोधर मंगल कार्यालय ,आरमोरी येथे सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व आरमोरीकरांनी सभेस उपस्थित राहावे असे आव्हान लोकहित संघर्ष समिती चे पदाधिकारी प्रफुल खापरे, अमोल मारकवार, रणजीत बनकर, निखिल धार्मिक, राहुल जुआरे, देवानंद दुमाणे, संजय वाकडे, राकेश सोनकुसरे, महेंद्र शेंडे ,मनोजजी वनमाळी , सुनील नंदनवार, विनोद निमजे, रिंकु झरकर, अनंता भोयर, विक्की उंदिरवाडे, शालिक पत्रे ,अशोक वाकडे, राजूजी अंबानी, कल्पनाताई तिजारे, अमीन लालानी, प्रदीप हजारे, दीपक गोंदोळे, शुभांगीताई गराडे,छायाताई मानकर ,विभाताई बोबाटे ,सुरज पडोळे, महादेव कोपुलवार, नेपचन्द्र पेलणे, शाबीर शेख, यांनी केले आहे.

Armoriarmori nagar parishadtax