अहेरी आगारातील भंगार बसच्या चक्क छतावरून पाणी

प्रवाशांची गैरसोय, तिकीट मात्र तेवढीच
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 27 जून – उपविभागातील नागरिकांना शहर अथवा गावांचा संबंध जोडण्यासाठी एकमेव प्रवासाचा साधन म्हणजे एसटी महामंडळाची बस आहे. मात्र या बसेसची अवस्था भंगार झाली असून चक्क छतावरून पाणी पडत असल्याने प्रवाष्यानी नाराजी व्यक्त केली आहे. अहेरी -सिरोंचा बस मध्ये सदर प्रकार घडला आहे. सध्यास्थित पावसाळा सुरू झाला असून कर्मचाऱ्यांसाठी शाळेही 26 जूनपासून सुरू झाले आहेत. या पावसाळ्यात महामंडळाच्या बसेसची हीच अवस्था कायम राहिली आणि सकाळच्या सुमारास पाऊस लागला तर विद्यार्थी शाळेतही ओल्या झालेल्या कपड्यानेच जावे लागणार आहे. ही मोठी शोकांतिका अहेरी आगारातील बसेसची अवस्था आहे.

सदर दिसणारे दृश्य हे अहेरी आगारातील अहेरी ते सिरोंचा मार्गे जाणारी बसमधील प्रवाशांच्या अंगावर छतावरून पाणी पडत असल्याने त्यांना छत्रीचा सहारा बसमधे घ्यावा लागल्याचे निदर्शनास येत आहे. उन्हाळा असो की पावसाळा असो अहेरी उपविभागातील नागरिकांना अतिदुर्गम भागात बस प्रवास करतांना नेहमीच भंगार बसणे ये जा करावे लागते. त्यामुळे बस प्रवाश्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
यासाठी अहेरी उपविभागातील रस्त्यांची दुरवस्था कारणीभूत असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे.

अहेरी उपविभागातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा येथील बस प्रवाश्यांना रहदारी करतांना अनेक अडचणी येतात कारण रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रहदारी करणाऱ्या नागरिकांना संताप व्यक्त होतो. तसेच या रस्त्यांची नुतनीकरण केव्हा होईल असा ब्रीदवाक्य तोंडून निघतो आहे. या पाचही तालुक्यांमधील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे बस भंगार झाले आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम साजरे होत आहेत मात्र अहेरी उपविभागातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळाले नाहीत अनेक ठिकाणी पक्के रस्ते, वीज, राहण्याची पक्की सोय म्हणून घर, शिक्षण आणि आरोग्य या समस्येकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. मात्र लोकप्रतिनिधींमधे उदासीनता दिसून येत असल्याचे मत प्रवश्यानी व्यक्त केले.

अहेरी बसस्थानकातून सिरोंचा येथे जायचं असल्याने बसमधून मला प्रवास करावा लागला असून अहेरी ते सिरोंचा या रस्त्याची प्रचंड दुरवस्था होऊन आहे त्यातच मी ज्या बसमधे बसलो होतो त्यावेळी पाऊस लागला होता. पाऊस लागून थोड्या वेळाने आमच्या अंगावर पाणी पडत होता त्यामुळे बसमधे छत्री घेऊन प्रवास करावा लागला आहे, परंतु ज्यांच्या जवळ छत्र्या नव्हत्या त्यांना त्या छतावरून पडणाऱ्या पाण्यामुळे भिजून प्रवास करावा लागला आहे त्यातलाच मी एक होतो.
– प्रवासी- जनार्दन कोठारे.

 

अहेरी उपविभागातील रस्ते इतके भंगार झाले आहेत की छोटी दुरुस्ती आगार पातळीवर करण्यात येत असून मोठ्या दुरुस्तीसाठी त्या बसेस विभागीय कार्यशाळेतच दुरुस्ती करणे आवश्यक आहे. कारण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बस बॉडी खिळखिळी होत आहे तरी सुद्धा आवश्यक ती आगार पातळीवरील कामे करण्यात येत आहे. त्यामुळे अहेरी आगाराला नवीन 25 बसेस तातडीने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
– चंद्रभूषण डी. घागरगुंडे,
आगार व्यवस्थापक अहेरी

हे पण वाचा :-