सरपंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे आम्ही मदतीपासून वंचित,

पत्रकार परिषदेत बेडगाव येथील लाभार्थ्यांनी दिली माहिती.सरपंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे आम्ही मदतीपासून वंचित.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,दि.१७ सप्टेंबर : देशात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी लसीकरण करून घेणे बंधनकारक आहे . त्यासाठी लसीकरनाबाबत महत्त्व पटवून देण्यासाठी ३ जूनला गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कोरची येथे भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली होती.

त्याच भेटीदरम्यान आम्ही आमच्या आरोग्यासाठीचे संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार हे सुद्धा उपस्थित होते. त्याच चर्चे दरम्यान नागरिकांच्या मनातून लसीकरणाबाबत भीती कमी व्हावी, नागरिक आरोग्याच्या तपासणीसाठी समोर यावे. ज्याप्रमाणे कोरोना संसर्ग झाल्यानंतर आपले सर्व काम धंदा सोडून १४ दिवस आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी तथा  डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे विलगीकरण कक्षात राहून प्रशासनाला सहकार्य केले अशा व्यक्तींना संस्थेच्या माध्यमातुन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे डॉ. गोगुलवार यांनी ठरविले होते.

आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या वतीने तालुक्यातील ३५ गावे लसीकरण करण्यासाठी घेतली होती. त्त्यामध्ये बेळगावचा समावेश नव्हता तरीही बेळगावामध्ये कोरोना संसर्गाचे रुग्ण जास्त प्रमाणात बाधित झाल्याने त्या ठिकाणीही लसीकरण करण्याचे बेळगाव गाव संस्थेमार्फत घेण्याचे ठरविले.

त्यानुसार आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच यांच्या सहमतीचे पत्र घेऊन यादी तयार करण्यात आली. त्यानंतर लसीकरण करण्याच्या वेळी ग्रामपंचायत बेडगाव येथील सरपंच चेतानंद किरसान यांनी आधी जिल्हाधिकारी यांचे पत्र आणा मगच विचार करू असे विधान केले असल्याची माहिती बेडगाव येथील लाभार्थ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोना संसर्ग झाल्यानंतर १४ दिवस विलगीकरण कक्षात राहिल्यानंतर मजुरांना पोट भरणे ही कठीण आहे मात्र अशाही परिस्थितीत बाहेर निघाल्यानंतर त्या रुग्णांना ही मदत धीर देणारी आहे. परंतु सरपंचाने सहकार्य केले नसल्याने आम्हाला या योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याचे प्रतिपादन पत्रकार परिषदेत उपस्थित लाभार्थ्यांनी केले.

ज्या लाभार्थ्यांनी आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार यांची भेट घेऊन विचारणा केली असता, तुमच्या गावातील सरपंच यांनी मला जिल्हाधिकारी यांचे पत्र आणा मगच विचार करू असे उत्तर दिले व माहिती घेण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना परत पाठविले त्यामुळे बेडगाव हे गाव लसीकरण अभियानातून वगळण्यात आले असल्याचे माहिती डॉ. गोगुलवार यांनी उपस्थित नागरिकांना दिली.

लाभार्थ्यांना या लाभापासून वंचित ठेवण्यामागे सरपंच चेतानंद किरसान हेच जिम्मेदार असल्यामुळे त्यांनी त्वरित ग्रामपंचायत बेडगाव येथे बैठक बोलावून ४६ नागरीक जे या सुविधेपासून वंचित राहिले आहेत त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी सरपंच चेतानंद किरसान यांना निवेदनातून केली आहे.

आज १६ सप्टेंबर रोजी विश्रामगृह कोरची येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती  या पत्रपरिषदेत बेडगाव येथील रामभाऊ नागरे, यशवंत वाळदे, राकेश पारटवार, दामोदर बोगा, दिलीप वाळदे, निर्मला नागरे, देवका वाढई, श्रीमती कमल मस्के, तेजस्विनी नागरे उपस्थित होते. सरपंच चेतानंद किरसान यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

बेडगाव या गावाला कोरोना मुक्त  गावात सहभागी करुन घेण्यासाठी संस्थेचे कार्यकार्ये बेडगाव येथील सरपंच व त्यांचे सहकारी यांना ग्राम पंचायत बेडगाव येथे भेट देऊन या अभियानाची माहिती दिली. परंतु सरपंच यांनी जिल्हाधिकारी यांचे पत्र आणा मगच  आम्ही विचार करू असे उत्तर दिल्यामुळे संस्थेने बेडगाव हे गाव अभियानात जोडले नाही. तरीही या लाभार्थ्यांना लाभ देता येईल काय यावर विचार सुरू आहे.
डॉ. सतीश गोगुलवार
संस्थापक
आम्ही आमच्या आरोग्यासाठी

हे देखील वाचा,

पुन्हा..वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करुण केले गंभीर जखमी; तर दुसरीकडे बैलावर हल्ला करुण केले ठार

‘सर्वोत्कृष्ट पोलीस घटक’ दोन पुरस्कार गडचिरोली पोलीस दलास जाहिर

वीज पडून १०० ते ११० शेळ्या व मेंढ्या जागीच ठार,पांच ते सहा लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज

CEO Kumar Ashirwadlead newsCM Uddha Thakaraysanjay mina dio gadchiroli