नागपुर ६ जुलै :- भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल झाले आहेत. त्यांच्या आगमनानंतर नागपुरात जल्लोष दिसून येत आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर देवेंद्र फडणवीस प्रथमच नागपुरात आज दाखल झाले. नागपूर विमानतळावर देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करण्यासाठी शेकडो नागपूरकरांची गर्दी झाली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर ढोल ताशे वाजविण्यात आले.
भाजप कार्यकर्ते आणि नागरिकही विमानतळावर पोहचत मोठा जल्लोष केला. नागपूर विमानतळ ते धरमपेठ आणि फडणवीस निवासस्थानापर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार आहे. तर लक्ष्मीभवन चौकात फडणवीस यांची जाहीर सभाही होणार आहे. नागपूरकर जनतेचे अभिवादन स्वीकारण्याकरता फडणवीसांसाठी खास रथ तयार करण्यात आला होता.
नागपूरकरांचे मानले आभार!
नागपूरकरांनी नेहमीच मला साथ दिली आहे. पाच वेळा मला आमदार केले आहे. दोन वेळ नगरसेवक म्हणून आणि महापौर म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला आहे. आज पुन्हा मी उपमुख्यमंत्री म्हणून आलो तर तुमचे प्रेम कायम आहे. तुमचे मनापासून आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे देखील वाचा,