महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडीतील बालकांशी केला दिलखुलास संवाद

महिला व बालविकास मंत्र्यांनी स्वतः मोजली अंगणवाडीतील बालकांची वजन, उंची.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अमरावती, दि. २१ मार्च : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुर्‍हा येथील अंगणवाडीमध्ये प्रत्यक्ष जाऊन महिला आणि बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी काल बालकांची वजन आणि उंची स्वतः मोजली. तसेच अंगणवाडीतल्या या बालकांसोबत दिलखुलास संवादही साधला.

यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडीतील बालकांच्या प्रकृतीविषयी आणि पोषणाविषयी अंगणवाडी सेविकांकडून माहिती जाणून घेतली. बालकांना पोषण आहार कशाप्रकारे दिला जातो आहे, या पोषणआहारमुळे बालकांच्या प्रकृतीत कशी सुधारणा होत आहे याची स्वतः पाहणी करत ॲड. ठाकूर यांनी बालकांची स्वतः वजन आणि उंची मोजली.

यावेळी त्यांनी चिमुकल्या बालकांशी मनमोकळे संवाद साधत त्यांना बोलते केले. काही बालकांना त्यांनी स्वतः उचलून घेतले आणि त्यांच्याशी जवळीक साधत त्यांच्यात रमल्या. महिला आणि बालविकास मंत्र्यांच्या या प्रेमळपणामुळे अंगणवाडीतील बालकांसह अंगणवाडी सेविका ही भारावून गेल्या होत्या. यावेळी अमरावती जिल्हा परिषदच्या महिला आणि बालकल्याण सभापती पूजाताई आमले यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि सरपंच उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

लातूर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने होणार ७० फूट उंचीचा पुतळा उभारणी

 

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा 14 लाखांचा प्रतिष्ठित संशोधन प्रकल्प गोंडवाना विद्यापीठाला मंजूर

 

 

lead news