अमरावती जिल्ह्यातील १३० गावांचा १० दिवसासाठी कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती : अमरावती जिल्ह्यात आता ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने १३० गावे १० दिवसांसाठी कडकडीत बंद करण्यात आली आहे.

या १० दिवसाच्या काळात १३० गावातील व्यक्ती घराबाहेर व इतर गावात जाऊ शकणार नाही आणि त्या गावात बाहेर गावाहून येणाऱ्यांना कोणालाही प्रवेश राहणार नाही. जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसीलदारांनी ज्या गावात कोविड रुग्णसंख्या वाढलेली आहे त्याठिकाणची स्थिती पाहून तहसीलदार यांनी गाव बंदीचे आदेश काढले आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत ८७ टक्के कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासन अलर्ट झाले असून हॉटस्पॉट ठरणारी १३० गावं सील करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

यासोबतच तालुकास्तरावर तहसीलदार व आरोग्य अधिकाऱ्यांना ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे १३० गावात बाहेर गावातील नागरीक गावात येणार नाही व गावातील नागरिक घराबाहेर व इतर गावात जाणार नाही ही काळजी घेण्यात येत आहे. १३० गावातील नागरिकांनी कडकडीत बंद च्या आदेशाचे पालन करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला आहे.

हे देखील वाचा : 

अवघ्या 15 दिवसांत 3 सख्ख्या भावांचा कोरोनाने निधन, उद्धवस्त झालं कुटुंब

ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

Amravati Corona lockdownlead story