९ वर्षाच्या चिमुकलीने देश कोरोनामुक्तीसाठी पवित्र रमजान महिन्याचे ठेवले सर्व रोजे

देश कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी अल्लाहकडे केली प्रार्थना

बुलडाणा : देशभरात कोरोना प्रादुर्भावाने थैमान घातले आहे. देशात कोरोना बाधितांची रुग्ण संख्येत दिवसेंदिवस मोठ्या झपाट्याने वाढ होत आहे. त्यासाठी देशातील कोरोनाचे संकट मुक्त होण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील आझाद नगर येथील ९ वर्षाची अबीरा देशमुख हि चिमुकली कडक उन्हात सुरु असलेल्या पवित्र रमजान महिन्याचे सर्व उपवास (रोजे) ठेवून अल्लाहकडे प्रार्थना करीत आहे.

अबिरा देशमुख अल्लाहकडे प्रार्थना करतांना म्हणतात कोरोना प्रादुर्भावाने जगातील जनता त्रस्त झाली आहे. जग व भारत देश कोरोनामुक्त व्हावे. सर्व देशात पहील्यासारखे जनजीवन निर्माण व्हावे. कोरोनाबाधितांची प्रकृती बरी व्हावी. देश या कोरोना संकटातून बाहेर पडावे. अशी प्रार्थना अल्लाहकडे दररोज रोजा इफ्तार करतांना अबिरा आपल्या कुटुंबियांसमवेत करीत आहेत.

शेगाव येथील सेंट झेवियर्स इंग्लिश स्कुल मध्ये इयत्ता चौथीत शिकणाऱ्या अबीरा फहीम देशमुख हिने सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी ४.४५ वाजेपासून ते सायंकाळी ६.४८ वाजेपर्यंत रोजाच्या नियमांनुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशी पोटी राहून अल्लाह (ईश्वर) प्रति श्रद्धा व्यक्त केली आहे.

अबीरा हिने ठेवलेले महिन्याभराच्या रोजे थक्क करणारे ठरले आहे. अबिराच्या आई वडिलांनी तिला हिंमत दिली असल्याने ती चिमुकली भारत देश कोरोना मुक्त होण्यासाठी अल्लाह कडे दुवाच्या माध्यमातून साश्रुनयनांनी दररोज साकडे घालत आहे.

हे देखील वाचा :

मुस्लीम धर्मगुरुंच्या अंत्यसंस्कारासाठी जमली तुफान गर्दी

वर्धा वाढत्या कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास पालिका असमर्थ

Abira Deshmukhlead story