‘ग्लोबल अँँप्रूवल रेटिंग’ च्या आकडेवारीनुसार पंतप्रधान मोदींची लोकप्रियता घटली; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बसला फटका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था : पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्राला आलेल्या अपयशाच्या आरोपांमुळे कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. मॉर्निंग कन्सल्ट या अमेरिकेतील कंपनीच्या ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंग च्या आकडेवारीनुसार मोदींची लोकप्रियता कमी झाली आहे. तर अन्य एका सर्वेक्षणामध्ये पहिल्यांदाच मोदींची लोकप्रियतेचा आलेख ५० टक्क्यांच्या खाली उतरला.

ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण-कोरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियते संदर्भातील माहिती आणि आकडेवारी गोळा करणाऱ्या तसेच या देशातील प्रमुख नेत्यांना मान्यता देण्यासंदर्भात सर्वसामान्याचे मत जाणून घेणाऱ्या मार्निंग कन्सल्टच्या ‘ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंग’ ची ताजी आकडेवारी समोर आली.

१३ देशांच्या राष्टाध्यक्षांमध्ये मोदी सर्वाधिक लोकप्रिय असले तरी १ एप्रिल ते ११ मे दरम्यान त्यांच्या लोकप्रियतेमध्ये १० टक्क्यांनी घसरण झाली आहे. एक एप्रिलपूर्वी मोदींची लोकप्रियता म्हणजेच अ‍ॅप्रूवल रेटिंग ७३ टक्के इतकी होती.

मात्र ११ मे रोजी त्यामध्ये १० टक्क्यांची घसरण होऊन ती ६३ वर आली. म्हणजेच एक मे ते ११ मे दरम्यान मोदींचे अ‍ॅप्रूवल रेटींग १० टक्क्यांनी कमी झाली. मोदींच्या डिसअ‍ॅप्रूवल रेटिंगमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एक मे आधी २१ टक्क्यांवर असणारी हे रेटींग ११ मे नंतर ३१ टक्क्यांवर पोहचली आहे.

हे देखील वाचा : 

सल्लागार समितीतील विषाणू शास्त्रज्ञाचा शाहिद जमील यांचा राजीनामा

देशात कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, नव्या बाधितांचा आकडा तीन लाखांच्या खाली

 

lead storynarendra modi