साईबाबा यांच्यासह ५ जणांची निर्दोष मुक्तता, जन्मठेपेची शिक्षाही रद्द..!

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निकाल..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 5 मार्च – माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून संबंधांच्या आरोपांखाली अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा आणि इतर पाच जणांची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मिकी एसए मिनेझिस यांनी हा निकाल दिला आहे.
प्रा.जी.एन साईबाबा यांच्यासाह हेम मिश्रा, महेश तिर्की, विजय तिर्की, नारायण सांगलीकर, प्रशांत राही आणि पांडू नरोटे ( यांचा तुरुंगातच मृत्यू झाला होता.) या सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

जीएन साईबाबा आणि त्यांच्या सहआरोपींना २०१४ मध्ये माओवादी गटांशी संबंध असल्याच्या आणि भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालयाने २०१७ साली दोषनिश्चिती केली होती. त्याविरोधात करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयासमोर सविस्तर सुनावणी पार पडल्यानंतर आज न्यायालयाने यासंदर्भातला निकाल दिला आहे. या सर्व आरोपींची सबळ पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आली आहे अशी माहिती साईबाबा यांचे वकील हरिष लिंगायत यांनी दिली आहे.

हे पण वाचा :-

GadchiroligadchirolipolicehighcourtnaxalnaxalcellSai baba